महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूर : मुरूडमध्ये दुकान मालकाकडून २० वर्षीय कामगाराची हत्या - krushna panchal murder case latur

मुरूड येथील कृष्णा बबन पांचाळ (वय २०), असे मृत तरूणाचे नाव आहे. गेल्या ८ वर्षांपासून अ‍ॅटोमोबाईल्सच्या दुकानात काम करणाऱ्या कृष्णाची दुकानमालक आरोपी सचिन गायकवाड याने निर्दयीपणे हत्या केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून कृष्णा गायब होता.

मृत कृष्णा बबन पांचाळ

By

Published : Nov 15, 2019, 3:19 PM IST

लातूर - गेल्या ८ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २० वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. मुरूड येथील कृष्णा बबन पांचाळ (वय २०), असे मृत तरूणाचे नाव आहे. गेल्या ८ वर्षांपासून अ‍ॅटोमोबाईल्सच्या दुकानात काम करणाऱ्या कृष्णाची दुकानमालक आरोपी सचिन गायकवाड याने निर्दयीपणे हत्या केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. घटनेचे पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपने तरुणाचे डोके तळ्याच्या कडेला, हात-पाय मुरूड शिवारात तर धड उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी येथे फेकून दिले होते.

गेल्या आठ दिवसांपासून कृष्णा गायब होता. त्यामुळे नातेवाईकांनी सचिन गायकवाड याच्यावर संशय घेत पोलिसात तक्रार नोंदवली होती. आठ दिवस उलटूनही घटनेचा उलगडा होत नव्हता. दरम्यान, पोलिसांनी सचिन यास ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन याने कृष्णाला शहरातील एका दुकानात दारू पाजली. तो नशेत असतानाच एकाच्या मदतीने त्याची निघृण हत्या केली.

हेही वाचा -तिरोडा येथे विहिरीत आढळला तरूणाचा मृतदेह

घटनेमागचे मुख्य कारण अद्यापही समोर आलेले नाही. दरम्यान, व्यावसायिक स्पर्धेतून ही घटना झाली असल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेने मुरूड शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून मुरूड पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details