महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी पार पडताच लातूरमध्ये जल्लोष - लातूर शिवसेना न्यूज

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच लातुरात शिवसेना आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

लातुरात जल्लोष
लातुरात जल्लोष

By

Published : Nov 28, 2019, 9:54 PM IST

लातूर - राज्यातील सत्ता स्थापनेच्या नाट्याला अखेर पूर्णविराम मिळाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच लातुरात शिवसेना आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

लातूरमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष


लातूर शिवसेनेच्यावतीने शिवाजी चौक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - घटनेच्या तत्व आणि मुल्यानुसार राज्याला पुढे नेणार, शेतकरी केंद्रस्थानी - एकनाथ शिंदे
ठाकरे घराण्यातील पाहिले मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. मुंबईतील शिवतीर्थावर शपथविधी सुरू होताच लातूरमधील शिवाजी चौकात जल्लोष सुरू झाला होता. शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटले. लातूर जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही, तरी जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी यांनी हा आनंद उत्सव साजरा केला.

ABOUT THE AUTHOR

...view details