महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्थलांतरित मजुरांच्या आरोग्य चाचणीसाठी शिवसेनेच्या 'या' खासदाराचा पुढाकार - स्थलांतरीतांची आरोग्य चाचणी

लॉकडाऊनमुळे राज्यात परप्रांतीय मजूर अडकले होते. काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे अनेकांनी पायी प्रवास करत आपले गाव गाठले. परिणामी सरकारने परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावाला जाण्याची परवानगी दिली. मात्र, यासाठी आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.

shivsena helps to migrant  migrant health check up  स्थलांतरीतांची आरोग्य चाचणी  शिवसेना न्युज
गरजूंनी संपर्क साधण्याचे खासदार सावंतांचे आवाहन

By

Published : May 6, 2020, 1:18 PM IST

मुंबई - राज्यात अडकलेले स्थलांतरित मजूर, कामगार यांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी श्रमिक एक्सप्रेस सुरू करण्यात आली. त्यासाठी त्यांना आवश्यक असलेले आरोग्य प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेच्या शाखेने पुढाकार घेतला आहे.

शिवसेनेकडून स्थलांतरीत मजुरांची आरोग्य चाचणी, गरजूंनी संपर्क साधण्याचे खासदार सावंतांचे आवाहन

लॉकडाऊनमुळे राज्यात परप्रांतीय मजूर अडकले होते. काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे अनेकांनी पायी प्रवास करत आपले गाव गाठले. परिणामी सरकारने परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावाला जाण्याची परवानगी दिली. मात्र, यासाठी आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. आरोग्यप्रमाणपत्र घेतल्यानंतरच त्यांना प्रवास करता येत आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्या आदेशानुसार आणि विभाग प्रमुख पांडूरंग सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा क्रमांक 221 च्या वतीने इतर राज्यातील कामगारांना आपल्या गावी परतण्यासाठी मोफत आरोग्य चाचणी करून घेतली जाते. सोबत सर्व कागदपत्रांची पूर्तता करून स्थानिक पोलीस व आरोग्य तपासणी करून परवानगी मिळवून देण्यात येत आहे. तसेच गरजूंनी शिवसेना शाखेशी संपर्क साधावा, अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details