लातूर - लातूर शहर हा मतदारसंघ काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातील गड आहे. मात्र, या जागेवरही सुरुंग लावण्याच्या दृष्टीने भाजपकडून खेळी केली जात आहे. आतापर्यंत काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या सुन अर्चना पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याबाबत मात्र, चित्र स्पष्ट नसले तरी यासंदर्भात भाजपसोबत बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे भाजपकडून लातूर शहरच्या उमेदवाराबाबत उत्कंटता शिगेला पोहोचली आहे.
लातूर शहरातून आमदार अमित देशमुख हे निवडणुकीच्या आखाड्यात असताना भापजपकडून मात्र, वेगळीच खेळी केली जात आहे. आतापर्यंत अर्चना पाटील यांच्या नावाची चर्चा दबक्या आवाजात होती. मात्र, लातूर शहराच्याच उमेदवाराचे नाव घोषित न केल्याने या ठिकाणी अर्चना पाटील याच भाजपकडून निवडणुक लढवतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. या अनुषंगाने चार दिवसांपूर्वी बैठकही झाल्याचे समजत आहे.
हेही वाचा - विलासरावांचे धाकटे चिरंजीवही निवडणुकीच्या रिंगणात, भाजपकडून रमेश कराडांचा पत्ता कट