महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अभिनव उपक्रम; शेतकऱ्यांच्या बांधावरुन भाजीपाला घेऊन युवासेना नागरिकांना देणार मोफत

वाहतूक ठप्प असल्याने नागरिकांना भाजीपाला मिळत नाही. तर शहरालगतच्या गावात शेतकऱ्यांचा भाजीपाला हा शेतातच सडून जात आहे. त्यामुळे युवासेनेने शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेऊन तो नागरिकांना मोफत देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

sena
नागरिकांना देण्यात येणारा भाजीपाला

By

Published : Apr 15, 2020, 12:05 PM IST

लातूर - कोरोनामुळे उद्भवलेल्या परस्थितीने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. वाहतूक ठप्प असल्याने नागरिकांना भाजीपाला मिळत नाही. या दोघांमधील दुवा साधत शेतकऱ्यांकडून विकत भाजीपाला घेत नागरिकांना घरपोच देण्याचा अभिनव उपक्रम युवा सेनेच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही चार पैसे मिळत आहेत आणि गरजू कुटुंबीयांना मदत होत आहे.

अभिनव उपक्रम; शेतकऱ्यांच्या बांधावरुन भाजीपाला घेऊन युवासेना नागरिकांना देणार मोफत

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरातील सर्व ठिकाणच्या भाजी मंडई बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हातगाड्यावरील अधिकच्या दरातील भाजी घेण्याशिवाय ग्राहकांकडे पर्यायच उरलेला नाही. मात्र, नागरिकांची आणि शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता, युवासेनेच्या वतीने अनोख्या सामाजिक उपक्रमाला सुरवात झाली आहे. शेतकऱ्यांकडील भाजीपाला बांधावर जाऊन आहे, त्या दरात घेतला आणि शहरातील गरजवंताना तो मोफत दिला जात आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली तरी युवासेनेसारख्या संघटनांनी राबवलेल्या उपक्रमाचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. युवा सेनेच्यावतीने टनावर भाजीपाला घेतला जात असून शहरातील विविध भागात तो मोफत दिला जात आहे.

गेल्या चार दिवसांपासून हा उपक्रम सुरू आहे. भाजीपाल्याबरोबरच द्राक्षे आणि टरबूज देण्यासाठीही युवासेना पुढे सरसावली आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात जो-तो मदतीचे हात पुढे करीत आहे. मात्र, अभिनव उपक्रमामुळे शेतकऱ्यांना न्याय तर अनेकांची गरज भागत आहे. शहरालगतच्या गावात शेतकऱ्यांचा भाजीपाला हा शेतातच सडून जात होता. मात्र, कमी दराने का होईना, आता त्याची विक्री होऊ लागल्याने त्यांच्यामध्ये समाधान आहे. तर ग्राहकांचीही तारांबळ कमी झाली आहे. आतापर्यंत भाजीपाल्याचे वाटप केले जात होते. पण द्राक्ष आणि टरबूजही शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे वाया जाऊ न देता शेतकऱ्यांना परवडेल अशा दरात खेरदी करून नागरिकांना वाटप करणार असल्याचे युवासेनेचे महाराष्ट्र राज्य सरचटणीस सुरज दामरे यांनी सांगितले आहे. यावेळी जिल्हा प्रमुख अ‍ॅड. राहुल माथोळकर, अ‍ॅड. रवी पिचारे यांची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details