लातूर - सततच्या पावसामुळे लातूर तालुक्यातील शिवणी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे दुष्काळी भाग असलेले लातूरकर आनंदी झाले होते. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. मांजरा नदीवर असलेल्या शिवणी प्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्याने प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले. पण यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आवश्यक त्यावेळी दरवाजा बंद करता आला नाही, आणि शिवणी प्रकल्पातील पाणी वाहून गेले. त्यामुळे भर पावसातही या प्रकल्पात पाणी नाही.
अधिकाऱ्यांचा 'प्रताप'!! पावसातही भरलेल्या शिवणी प्रकल्पाने गाठला तळ - Manjara river and water flow
शिवणी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. मात्र प्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्याने प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले. पण यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आवश्यक त्यावेळी दरवाजा बंद करता आला नाही, आणि शिवणी प्रकल्पातील पाणी वाहून गेले.
गेल्या चार दिवसांपासून लातूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे लहान-मोठे प्रकल्प हे तुडुंब भरले आहेत. लातूर शहरापासून जवळच असलेल्या शिवणी प्रकल्पही भरला होता. मात्र, धोक्याची पातळी ओलांडलली म्हणून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री या प्रकल्पावरील दरवाजा उघडला व पाण्याला वाट मोकळी करून दिली. परंतु, ऐन वेळी दरवाजा बंद करता आला नाही. यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रकल्पातील पाणी रात्रभर मांजरा नदी पत्रात वाहून गेले आहे. त्यामुळे पावसाने प्रकल्प भरला पण अधिकारी यांनी केलेल्या कारनाम्यामुळे अवघ्या काही तासात हा प्रकल्प तळाला गेला आहे.
बुधवारी दुपारपर्यंत हीच अवस्था होती. पावसामुळे प्रकल्पात पाणीसाठा तर होत आहे, परंतु दरवाजा खुला असल्याने पाणी वाहून जात आहे. एकीकडे पावसामुळे लहान-मोठे प्रकल्प भरले आहेत. पण शिवणी प्रकल्पाने तळ गाठला आहे. बुधवारी सकाळी दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र अतिरिक्त पाण्याचा धोका टाळण्यासाठी केलेल्या या खटाटोपीत प्रकल्पातील आहे ते पाणी ही वाहून गेले आहे.