लातूर : शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी आंदोलनाच्या निमित्ताने भाजप-शिवसेना आमने-सामने आल्याचे चित्र बघायला मिळाले. शिवसैनिकांनी इंधन दरवाढीविरोधात तर भाजपने वीजबिलाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारविरोधात जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंदोलन केले.
शिवसेनेची केंद्र सरकारविरोधात तर भाजपची राज्य सरकारविरोधात आंदोलने
इंधन दरवाढीविरोधात उदगीरमध्ये शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तर लातूरमध्ये भाजपच्या वतीने वीजबिल वसुलीविरोधात महावितरण कार्यालयास टाळे ठोकले.
जिल्ह्यात शिवसेना-भाजप आमने-सामने
अहमदपूरमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. तर इंधन दरवाढीविरोधात उदगीरमध्ये शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तर लातूरमध्ये भाजपच्या वतीने वीजबिल वसुलीविरोधात महावितरण कार्यालयास टाळे ठोकले. उदगीरमध्येही भाजपने महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. एकंदरीत भाजपने राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महागाईला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे सांगत आंदोलन केले.