लातूर- निलंगा तालुक्यातील केळगाव येथे महावितरण विद्युत प्रवाहाची तार तुटून 18 मेंढ्यांच्या पिल्लांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दिगंबर गणपती कोकरे या मेंढीपालन करणाऱ्या व्यक्तीची ही पिल्ली दगावली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गावातील गोरोबा विठोबा काळे यांच्या शेतातील सर्वे नंबर १६० अ मध्ये कोकरे हे पिल्ली बसवून इतर मेंढरे चारण्यासाठी शेतात गेले होते. त्यावेळी विद्युत प्रवाहाची तार तुटल्याने शॉक लागून 18 मेंढ्यांच्या पिल्ल्यांचा मृत्यू झाला आहे. यातील एका पिल्ल्याची किंमत 6 हजार रुपये असून या मेंढी पालकाचे 1 लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा -कोरोनाची धास्ती: महाराष्ट्रात 'इथे' मिळतीये कपभर चहाच्या दरात कोंबडी...