लातूर - राज्यभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, हॉटस्पॉट ठरलेल्या उदगीरमध्ये एका शाळेत वर्ग भरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फिजिकल डिस्टन्सचे तीन-तेरा वाजवत एकाच वर्गात 20 ते 25 विद्यार्थी घेऊन शिकवण्या होत असल्याचे समोर आले आहे.
अक्षरनंदन प्राथमिक व माध्यमिक शाळेने यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे पाहिले अक्षर गिरवले आहे. महामारीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली नाहीय. मात्र उदगीरमधील सुरू असलेल्या शाळेवर शासन कशाप्रकारे कारवाई करणार, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. मागील आठ दिवसांपासून अशा प्रकारे वर्ग भरत असल्याचे स्पष्ट झाले आहेत.