लातूर- पावसाळा सुरु होऊन अडीच महिने उलटले तरी रेणापूरसह लातूर, औसा तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. दुष्काळी परिस्थितीने शेतकरी हवालदिल झाला असताना प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन शुक्रवारी रेणापूर तहसील कार्यालयावर संभाजी सेनेच्यावतीने जनावरांसह मोर्चा काढण्यात आला.
लातुरात संभाजी सेनेचा जनावरांसह तहसील कार्यालयावर मोर्चा - लातूर बातमी
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ 50 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपातील पिकांचे नुकसान तर झालेच आहे. शिवाय भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल दरात जनावरांना विकावे लागत आहे. असे असतानाही जिल्ह्यात एकही चारा छावणी नाही.
हेही वाचा-लातूर : उजनीचे पाणी तर दूरच, गतवेळच्या रेल्वेचे बिल अदा करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ 50 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपातील पिकांचे नुकसान तर झालेच आहे. शिवाय भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल दरात जनावरांना विकावे लागत आहे. असे असतानाही जिल्ह्यात एकही चारा छावणी नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी, सर्कलनुसार चारा छावण्या सुरू कराव्यात, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफ करुन मोफत वीज द्यावी, मागणीनुसार टँकर सुरू करावेत, या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करुन एस. टी पास मोफत करावेत, अशा मागण्या संभाजी सेनेच्यावतीने करण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष धर्मराज पवार यांच्या नेतृत्वाखाली हा जनावरांचा मोर्चा रेणापूर तहसीलवर धडकला. यावेळी तालुक्यातील शेतकरी आपली जनावरे घेऊन दाखल झाले होते. यावेळी संभाजी सेनेचे योगेश देशमुख, सुधाकर सोनवणे, एकनाथ काळे यांची उपस्थिती होती. पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.