लातूर- जिल्ह्यात दिवसेंदिवस अवैध वाळू उपसा होत असल्याने नदीपात्राचे स्वरूपच बदलत आहे. शासन बंदी असतानाही वाळू उपसा होत असून याकरता शासकीय अधिकारीच कंत्राटदारांना मदत करत असल्याचा आरोप संभाजी सेनेच्या वतीने करण्यात आला होता. या संबंधी योग्य कारवाई होत नसल्याने आज संभाजी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
लातुरात अवैध वाळू उपसा विरोधात संभाजी सेनेची निदर्शने
संबंधित अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संभाजी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, असे असतानाही कारवाई होत नसल्याने आज संभाजी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निदर्शने करण्यात आली.
जिल्ह्यात मांजरा नदीपात्रासह गावलागतच्या नद्यांवरून अवैध वाळू उपसा केला जात आहे. सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे, संबंधित अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संभाजी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, असे असतानाही कारवाई होत नसल्याने आज संभाजी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निदर्शने करण्यात आली. कंत्राटदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे नदीपात्रे कोरडी आहेत. याचाच फायदा कंत्राटदार घेत असून त्यांना महसूलचे अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप संभाजी सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश देशमुख यांनी केला आहे. कारवाई करावी अन्यथा कार्यलयासमोर ढोल बजाव आंदोलन केले जाणार असल्याचे देखील देशमुख यांनी सांगितले.
हेही वाचा-रेणा मध्यम प्रकल्पातील पाणी पिण्यासाठीचं राखीव, शेतकऱ्यांचा विरोध कायम