लातूर- भाजपच्या रेकॉर्डब्रेक विजयानंतर पराभवाचे खापर आता थेट काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्यावर फुटत आहे. अशातच पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीही त्यांना टोला लगावला आहे. आमदार देशमुखांनी निलंग्यापेक्षा लातूर शहर मतदारसंघात लक्ष दिले असते. तर, चारदोन मते येथेही वाढली असती, अशी कोपरखळी त्यांनी देशमुखांना मारली.
विजयानंतर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांच्या आमदार देशमुखांना कोपरखळ्या - latur lok sabha
आमदार देशमुखांनी निलंग्यापेक्षा लातूर शहर मतदारसंघात लक्ष दिले असते. तर, चारदोन मते येथेही वाढली असती; पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांची कोपरखळी
लातूर लोकसभेची निवडणूक ही पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार अमित देशमुख यांनी प्रतिष्ठेची केली होती. अमित देशमुख यांनी गतवैभव मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. तर, वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पालकमंत्र्यांनी लक्ष केंद्रित केले होते. जिल्ह्यातील निलंगा, अहमदपूर, उदगीर आणि लातूर शहर या चारही विधानसभा मतदार संघात भाजपने मताधिक्य घेतले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सहाही मतदार संघात भाजपचा झेंडा फडकवणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यशाबरोबरच जबादारी वाढली असून वरिष्ठांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.