लातूर- पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर हे सहकुटुंब बालाजी दर्शनासाठी तिरूपती तिरूमला येथे गेले आहेत. गेल्या एक महिन्यापासून निलंगा विधानसभा मतदार संघात आपला प्रचार केल्यानंतर आता देव दर्शनासाठी ते आंध्र प्रदेशातील बालाजी देवस्थान येथे दाखल झाले.
निवडणूकीच्या निकालाआधी संभाजीराव निलंगेकरांनी घेतले बालाजी दर्शन - maharashtra vidhansabha election
गेल्या एक महिन्यापासून निलंगा विधानसभा मतदार संघात आपला प्रचार केल्यानंतर आता देव दर्शनासाठी संभाजीराव निलंगेकरआंध्र प्रदेशातील बालाजी देवस्थान येथे दाखल झाले.
संभाजीराव निलंगेकरांनी घेतले बालाजी दर्शन
त्यांच्यासोबत लहान बंधू अरविंद पाटील निलंगेकर, मुलगा राजवीरसह कुटुंबातील इतर सदस्यही गेले असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासमोर मोठे आव्हान नसल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा मतदार संघात आहे. याच कारणामुळे ते विजयाचा पहिला गुलाल तिरूपती बालाजी येथे उधळणार असल्याचे बोलले जात आहे. तर त्यांचे समर्थक आतापासूनच सोशल मीडियावर विजयाचे पोस्टर टाकून जल्लोष करत आहेत.