लातूर- शहरातील अंबाजोगाई रोडवरील श्रीकृष्ण इडली सेंटरमध्ये आज रविवारी इडली-सांभरच्या प्लेटमध्ये चक्क पाल आढळून आली. यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र, ग्राहकाच्या वेळीच ही बाब निदर्शनास आल्याने त्याच्या जीवाचा धोका टळला.
लातूरात चक्क इडली-सांभरमध्ये आढळली पाल; अन्न प्रशासन विभागाचा कानाडोळा - लातूर बातमी
शहरातील अंबाजोगाई रोडवरील श्रीकृष्ण इडली सेंटरमध्ये आज रविवारी इडली-सांभरच्या प्लेटमध्ये चक्क पाल आढळून आली. यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र, ग्राहकाला वेळीच ही बाब निदर्शनास आल्याने मोठी दुर्घटना टळली.
![लातूरात चक्क इडली-सांभरमध्ये आढळली पाल; अन्न प्रशासन विभागाचा कानाडोळा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4172349-thumbnail-3x2-latur.jpg)
शहरात जागोजोगी इडलीगृहे थाटण्यात आली आहेत. शहरात बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात सर्वच नाश्ताच्या ठिकाणी खवय्यांची गर्दी असते. रविवारी सकाळी मात्र, अंबाजोगाई रोड वरील श्रीकृष्ण इडली सेंटरमध्ये नेहमीप्रमाणे नाश्ता करायला गेलेले मनोज येवले यांच्या प्लेटमध्ये उडीद वड्याबरोबर पालही होती. येवले यांनी सांबर सोबत इडली खाण्यास सुरवात केली. मात्र, काही वेळातच त्यांना सांबरमध्ये पाल असल्याचे दिसून आले. त्यांनी लागलीच ही बाब हॉटेल चालकाच्या निदर्शनास आणून दिली. पण हॉटेल चालकाने अरेरावीची भाषा केली, असे येवले यांनी सांगितले. सध्या मनोज येवले यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सकाळ पासून या हॉटेलमध्ये 100 ते 150 लोकांनी नाश्ता केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या सुरक्षतेचा प्रश्न कायम आहे. अन्न प्रशासन विभागही याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे.