लातूर- औसा येथील भूईकोट किल्ल्यात ऐतिहासिक तोफा आहेत. या तोफांना सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी तोफगाडे अर्पण करण्यात आले. महाराष्ट्राच्या इतिहासात गड, किल्ल्यांना अनन्य साधारण महत्व आहे. हा ऐतिहासिक वारसा जोपासला जावा व भावी पिढीला किल्ल्यांच्या इतिहासाचे ज्ञान व्हावे, यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान राज्यातील किल्ल्यांच्या पुनरुज्जीवनाचे कार्य करत आहेत.
आशादायक; औसा किल्ल्यातील पुरातन तोफांना मिळाले 'तोफगाडे', सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम - भूईकोट
सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी औसा येथील भूईकोट किल्ल्यात ऐतिहासिक तोफांना तोफगाडे अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमामुळे मराठवाड्यात दुर्ग संवर्धनास चालना मिळण्यास नक्कीच मदत होईल. गड, किल्ल्यांचे सरक्षंण व पुनरुज्जीवन करणे हे केवळ शासनाचे कार्य नसून ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी असल्याचे मत यावेळी अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केले.
या ऐतिहासिक क्षणाला मोठ्या संख्येने किल्लेप्रेमी नागरिक उपस्थित होते. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे, रवि सुडे, अमोल पडिले, गौरव शेवाळे, नितीन कडगंजी, ज्ञानेश्वर चेवले, रघुवीर गणेश, चंद्रकांत साबदे, गोविंद रेड्डी, नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, नितीन वाघमारे, अनंत गायकवाड आदी उपस्थित होते.