लातूर -सध्या 'कोरोना व्हायरस' म्हणलं की धडकी भरते. मात्र, यापेक्षाही अधिक धसका घेतला आहे तो चिकन विक्रेत्यांनी आणि कुक्कुट पालन करणाऱ्यांनी. कारण गेल्या काही दिवसांपासून चिकनमुळे 'कोरोना व्हायरस'चा प्रादुर्भाव होत असल्याची अफवा समाज माध्यमावर पसरवली जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी चिकन खरेदीकडे पाठ फिरवली असून, लातुरात चिकनच्या विक्रीत निम्म्याने घट झाली आहे. त्यामुळे याबाबतीतील गैरसमज दूर करण्यासाठी आज (बुधवारी) विक्रेते व प्रशासनातील अधिकाऱ्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली.
कोरोनाच्या धास्तीने चिकनची विक्री निम्म्यावर; प्रशासनाने केला 'हा' खुलासा हेही वाचा -
चीन या देशामध्ये आढळून आलेल्या 'नोव्हेल कोरोना विषाणू'मुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले असून, चिनी नागरिकांचा मृत्यू होत आहे. भारतामध्ये मात्र, कोरोना हा रोग कोंबडीचे मांस खाल्ल्याने होत असल्याची अफवा समाज माध्यमावर पसरवली जात आहे. त्यामुळे साहजिकच ग्राहकांनी चिकन खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे कुक्कुटपालन करणारे तसेच चिकन विक्रेते यांचे नुकसान होऊ लागले आहे. लातूर जिल्ह्यात दिवसाकाठी 30 ते 35 टन तर लातूर शहरात 10 ते 12 टन चिकन लागत असते. मात्र, गेल्या आठवड्याभरात यामध्ये निम्म्याने घट झाली असल्याचे डॉ. विजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. शिवाय विक्रीच होत नसल्याने विक्रेतेही चिंतेत आहेत. यासंदर्भात राज्य शासनाने परिपत्रक ही काढून सांगितले आहे की, चिकनचा आणि या रोगाचा काहीही संबंध नसून कोणीही या अफवेला बळी पडू नये. मात्र, ग्राहकांचे मन वळीवणे हे सध्या कठीण होत आहे. यामुळेच बुधवारी कुक्कुटपालक तसेच विक्रेते आणि प्रधासनातील अधिकारी यांनी एकत्र येऊन यासंबंधीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.
चिकन विक्रीची पूर्वस्थिती निर्माण होणार का? हे पाहावे लागणार आहे. शिवाय सरकारने काढलेल्या परिपत्रकाचे वाचनही यावेळी करण्यात आले. समाजकंटक यांच्यावर कारवाई करण्याची मागणीकोरोना हा चिकन खाल्यामुळे होतो असा मजकूर सोशल मीडिया च्या माध्यमातून पसरवला जात0 आहे. त्यामुळे अशा समाजकंटकावर कारवाई करण्याची मागणी सर्व विक्रेत्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे केली आहे. या अफवेमुळे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा -