महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूरात धाडसी दरोडा; दोन कोटीच्या रोकडसह किलोभर सोने लंपास - लातूर दरोडा

तब्बल दोन कोटीची रोकड व एक किलो सोने लंपास करत धाडसी चोरी करुन चोरटे लंपास (1 kg of gold and 2 crore cash looted) झाल्याची घटना लातूर शहरात (Robbery In Latur) घडली आहे. शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत कव्हा नाका रिंग रोड परिसरातील कन्हैया नगरात कातपूर रोडवर (Robbery at Katpur Road Latur) राजकुमार अग्रवाल यांच्या घरी आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. (Latur Crime) (Latest News from Latur)

Robbery In Latur
Robbery In Latur

By

Published : Oct 12, 2022, 12:05 PM IST

लातूर : तब्बल दोन कोटीची रोकड व एक किलो सोने लंपास करत धाडसी चोरी करुन चोरटे लंपास (1 kg of gold and 2 crore cash looted) झाल्याची घटना लातूर शहरात (Robbery In Latur) घडली आहे. शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत कव्हा नाका रिंग रोड परिसरातील कन्हैया नगरात कातपूर रोडवर (Robbery at Katpur Road Latur) राजकुमार अग्रवाल यांच्या घरी आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. (Latur Crime) (Latest News from Latur)

2 कोटी रोख आणि 1 किलो सोने लुटले -या धाडसी दरोड्यात पाच चोरटे सहभागी असून त्यात वय 25- 30 वर्षाचे तीन व 35 वर्षाचे दोघे आहेत. चोरी करताना चोरटे मराठीत बोलत होते. त्यांनी मिल्ट्री रंगाचा जॅकेट व पॅन्ट अंगावर घातला होता. त्यात चौघांच्या पायात बूट तर एकाने चप्पल घातला होता. यावेळी चोरट्यांनी पिस्टल, कोयता, चाकूचा धाक दाखवून नगदी दोन कोटी व एक किलोपेक्षा जास्त सोने जबरीने लुटले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

लुटारुंच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना-यामध्ये कोणालाही इजा झालेली नाही. घटनास्थळी पोलीसांनी तात्काळ धाव घेत आरोपींच्या शोधात पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी अद्याप फिर्याद दाखल नसल्याने नेमका किती ऐवज चोरट्यांनी पळवला हे अद्याप समजले नसल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी 'ई-टीव्ही भारत'शी दूरध्वनीवरुन बोलताना सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details