लातूर - शहराला 'स्वच्छ शहर- सुंदर शहरा'चा पुरस्कार मिळाल्याने महापालिका प्रशासन पाठ थोपटून घेतात. मात्र, वास्तवातील चित्र काही वेगळेच आहे. पावसाळा सुरू झाला, की शहरातील गिरवलकर नगर भागातील रस्त्यावर खड्डे आणि साचलेली घाण हे नित्याचेच होऊन बसले आहे. त्यामुळे वाहने तर सोडाच पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे.
लातूर शहरात रस्त्यांची दुरवस्था, महापालिकेचा दावा फोल - लातूर पाऊस बातमी
मान्सूनपूर्व कामे झाल्याचा दावा मनपाच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र, प्रभाग क्रमांक 12 मधील रस्त्यांची आणि नाल्यांची दुरवस्था झाली आहे. यासह इतर प्रभागात पावसाचे पाणी नाल्यांद्वारे मार्गस्थ न होता थेट रस्त्यावर साचत आहे. याकडे ना मनपा प्रशासनाचे लक्ष आहे ना नगरसेवकांचे. या भागातील नागरिकांनी वेळेच्या अगोदर सर्व कर भरून देखील मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे.
मान्सूनपूर्व कामे झाल्याचा दावा मनपाच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र, प्रभाग क्रमांक 12मधील रस्त्यांची आणि नाल्यांची दुरवस्था झाली आहे. यासह इतर प्रभागांत पावसाचे पाणी नाल्यांद्वारे मार्गस्थ न होता, थेट रस्त्यावर साचत आहे. याकडे ना मनपा प्रशासनाचे लक्ष आहे, ना नगरसेवकांचे. या भागातील नागरिकांनी वेळेच्या अगोदर सर्व कर भरून देखील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. निवडणुकांच्या तोंडावर सिमेंट रस्त्याचे केवळ आश्वासन दिले जाते. मात्र, पूर्तता होत नाही. यापूर्वी रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी पालकमंत्री अमित देशमुख यांना देखील निवेदन देण्यात आले होते. गेल्या दहा वर्षांपासून रस्त्याची हीच अवस्था असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे लहान-मोठे अपघात हे नित्याचेच झाले आहे. शिवाय लगतच असलेल्या ग्रीनबेल्टमध्ये घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे रस्त्याबरोबर या भागातील नाल्यांची दुरुस्ती करण्याची मागणी विश्वनाथ खडके, परिहार सोळंके, माधव रासुरे, हरिदास पाटील, दयानंद बिडवे, राम तोडकर, स्वामी, भीमाशंकर समशेट्टी, गोकुंडे, कसबे यांनी केली आहे.