लातूर - बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि तिची अभिनेत्री पत्नी जेनेलिया डिसूजा हे 'कूल कपल' म्हणून परिचित आहेत. ते नेहमी सोशल मीडियावर अॅटिव्ह असतात. यात ते फोटो, व्हिडिओ शेअर करत चाहत्यांशी संपर्कात असतात. रितेश आणि जेनेलिया यांनी काही तासांपूर्वीच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. या दोघांनी राष्ट्रीय डॉक्टर डे च्या निमित्ताचे औचित्य साधत अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.
रितेशने जेनेलियासोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो म्हणतो, 'आम्ही अवयव दान करण्याविषयी विचार केला. लोकांना याविषयी कधी सांगितले नाही. पण, आज डॉक्टर डे च्या निमित्ताने, आम्ही अवयव दान करणार असल्याचे जाहीर करतो.'