लातुर- लातुरातील भाजपमध्ये सुरू असलेल्या बंडखोरांना थंड करण्यात पक्षाला यश आले असले तरी आम्ही लढणारच असे म्हणत अनेकांनी दंड थोपटले आहेत. यामुळे भाजपसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
औसा मतदारसंघातील प्रतिष्ठा पणाला लागलेल्या जागेसाठी शिवसेनेतील बंड केलेले माजी आमदार दिनकर माने यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. भाजपला जागा सुटल्याने शिवसैनिकात रोष होता. तानाजी सावंत यांच्या मध्यस्थीमुळे हा वाद शांत झाला आहे. मात्र, भाजपातील संभाजी पाटील समर्थक बजरंग जाधव यांनी अर्ज माघार घेतला नाही. तर किरण उटगे यांनी अर्ज मागे घेतला आहे. पालकमंत्री संभाजी पाटील यांचे बंधू अरविंद पाटील यांनी उघड-उघड बजरंग जाधव यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या अडचणी कायम आहेत. उदगीर येथील भाजपचे दोनवेळा आमदार असलेले सुधाकर भालेराव याचे तिकीट कापण्यात आले होते. येथे डॉ. अनिल कांबळे यांनी उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे भालेराव यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. मुख्यमंत्र्यांनी फोनवर त्याची मन धरणी केली आणि त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपचा प्रचार करणार असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा - 'माझं काय चुकलं'... उदगीरचे भाजप आमदार बंडाच्या पवित्र्यात