लातूर -पंचायत समितीच्या सभापतींच्या आरक्षणाची मुदत संपत आहे. यामुळेच आगामी अडीच वर्षासाठीचे आरक्षण सोडत प्रकिया गुरुवारी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हे आरक्षण जाहीर केले. सभापतीपद कोणासाठी आरक्षित राहते, हे जाणून घेण्यासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती.
लातूर जिल्ह्यातील दहा पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण जाहीर हेही वाचा... F-16 लढाऊ विमानांचा गैरवापर केल्याने अमेरिकेने पाकिस्तानला फटकारले
लातूर महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडीनंतर आता पंचायत समितीच्या सभापती पदाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निलंगा पंचायत समितीचे सभापतीपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव असणार आहे. रेणापूर अनुसूचित जमातीसाठी, देवणी पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणार आहे. शिरूर अंतपाळ ओबीसी सर्वसाधारण, औसा ओबीसी महिलेसाठी, लातूर सर्वधसाधारण महिला, अहमदपूर अनुसूचित जाती महिला तर चाकूर सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असेल. जळकोट पंचायत समिती सभापती पद हे सर्वसाधरण गटासाठी आरक्षित असणार आहे. जिल्ह्यातील १० पंचायत समितीमध्ये ६ जागा ह्या महिलांसाठी राखीव आहेत. याबाबतचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले. आरक्षणची सोडत प्रक्रिया पार पडली असून लवकरच या निवडीच्या तारखाही जाहीर केल्या जाणार असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले.
हेही वाचा... यश अपयशातून उभे राहण्याची उर्जा आईकडून मिळाली - शरद पवार
अहमदपूर आणि रेणापूर जागेच्या आरक्षणाची सोडत ही अनुसूचित जातीसाठी होती. मात्र, दोन्हीपैकी एक जागा ही महिलेसाठी राखीव ठेवण्यात आली. त्यामुळे नेमकी जागा कोणती असावी, यासाठी एका लहान मुलाच्या हाताने जिल्हाअधिकारी यांच्या समोर चिठ्ठी काढण्यात आली. यावेळी चिठ्ठीत अहमदपूरचे नाव आल्याने, अहमदपूरची जागा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असणार आहे.