महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रजासत्ताक दिन विशेष : येथे महात्मा गांधींच्या नावाने भरते यात्रा, यंदा ६७ वे वर्ष - प्रजासत्ताक दिन विशेष

या अनोख्या यात्रौत्सवाचे ६७ वे वर्ष असून ग्रामस्थांचा उत्साह कायम आहे. उजेड गावाच्या नावाप्रमाणेच येथील ग्रामस्थांनी महात्मा गांधी यांच्या जीवनप्रवासाला साजेल अशाच कार्यक्रमाचे आयोजन या चार दिवसीय यात्रेत केले आहे.

प्रजासत्ताक दिन विशेष
प्रजासत्ताक दिन विशेष

By

Published : Jan 26, 2020, 10:54 AM IST

लातूर - देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उजेड या गावी याच दिनाचे औचित्य साधून महात्मा गांधी यांच्या नावाने यात्रौत्सव पार पडला जातो. यंदा या अनोख्या यात्रौत्सवाचे ६७ वे वर्ष असून ग्रामस्थांचा उत्साह कायम आहे. उजेड गावाच्या नावाप्रमाणेच येथील ग्रामस्थांनी महात्मा गांधी यांच्या जीवनप्रवासाला साजेल अशाच कार्यक्रमाचे आयोजन या चार दिवसीय यात्रेत केले आहे.

उजेड गावात महात्मा गांधींच्या नावाने भरते यात्रा, यंदा ६७ वे वर्ष
या अनोख्या यात्रौत्सवाला पार्श्वभूमीही तशीच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात गावात कोणत्या देवाच्या नावाने यात्रौत्सव करायचा यावरून दुमत निर्माण झाले होते. यातूनच पर्याय काढत अहिंसा आणि प्रेमाची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांचे नाव देऊन यात्रा करायची, असे गावकऱ्यांचे ठरले आणि त्याला सर्वधर्मीय ग्रामस्थांनी सहमतीही दर्शवली. लोकसहभागातून गेल्या ६६ वर्षांपासून ही यात्रा पार पाडली जात आहे. दिवसेंदिवस याचे व्यापक स्वरूप होताना पाहवयास मिळत आहे. ग्रामस्थ, तरुण तसेच विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साह पाहवयास मिळतो.

हेही वाचा -'बीजमाता’ राहीबाई पोपरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

शुक्रवारी गावातून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. तर मुख्य चौकात रक्तदान शिबीर, पशुरोग निदान उपचार तसेच पशुप्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले होते. या चार दिवसात सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. अनोख्या पद्धतीने यात्रा पार पाडली जात असली तरी याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना लोकप्रतिनिधींचे. त्यामुळे लोकसहभागातूनच ग्रामस्थांना या कार्यक्रमाचे आयोजन करावे लागते. त्यामुळे किमान यात्रा काळात तरी आर्थिक मदत करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. आता राजकीय व्यासपीठ आणि सरकारी कार्यालयातच महात्मा गांधी यांच्या फोटोचा वापर केला जात होता. मात्र, उजेडकरांनी गावची यात्राच महात्मा गांधी यांच्या नावाने भरवून एक आदर्श घालून तर दिलाच आहे, शिवाय देशभक्तीचेही उत्तम उदाहरण सर्वांसोमोर ठेवले आहे.

हेही वाचा -उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे - नारायण राणे

आज प्रजासत्ताक दिनादिवशीच यात्रेचे मुख्य कार्यक्रम पार पाडतात. तर शेवटच्या दिवशी कुस्तीचा फडही भरला जातो. अशा या आगळ्यावेगळ्या यात्रौत्सवाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांची उपस्थिती असते.

ABOUT THE AUTHOR

...view details