लातूर - खरीप हंगामाच्या अंतिम टप्प्यात झालेल्या पावसाचा परिणाम आता दिसू लागला आहे. त्यामुळे रब्बीची पेरणी तर लांबणीवर पडलीच शिवाय, यंदा हरभरा या कडधान्याची लागवड तिपटीने वाढली आहे. त्यामुळे, जिल्ह्याचे शिवार हरभाऱ्याने हिरवागार दिसत असून पोषक वातावरणामुळे हे पिक घाटी लागण्याच्या अवस्थेत आहे. असे असतानाही वाढत्या उत्पादनाचा परिणाम दरावर होणार का, या चिंतेत शेतकरी आहेत.
लातूर जिल्ह्यात हरभऱ्याचा विक्रमी पेरा; रब्बीची पेरणी लांबणीवर पडल्याचा परिणाम - रब्बीची पेरणी लांबणीवर पडल्याचा परिणाम
जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ९५ हजार हेक्टर आहे. मात्र, पावसामुळे वेळेत आणि नियोजित पिकांची पेरणीच झाली नाही. पावसाचे पाणी शेतामध्ये साचल्याने तब्बल दीड महिना उशिराने शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ धरली. परंतू, ज्वारीसाठी पोषक वातावरण नसल्याने शेतकऱ्यांनी हरभरा या कडधान्याला प्राधान्य दिले. त्यामुळे तब्बल २ लाख हेक्टरावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ९५ हजार हेक्टर आहे. मात्र, पावसामुळे वेळेत आणि नियोजित पिकांची पेरणीच झाली नाही. पावसाचे पाणी शेतामध्ये साचल्याने तब्बल दीड महिना उशिराने शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ धरली. परंतू, ज्वारीसाठी पोषक वातावरण नसल्याने शेतकऱ्यांनी हरभरा या कडधान्याला प्राधान्य दिले. त्यामुळे तब्बल २ लाख हेक्टरावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. हे पीक प्रथमिक अवस्थेत असनाता किडीचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, सध्या पोषक वातावरण असल्याने रब्बीतील सर्वच पिके बहरात आहेत.
खरीपातील सोयाबीनचा दर साडेचार हराज क्विंटलवर पोहचला आहे. मात्र, यंदा सोयाबीन पीकाची लागवड तुलनेने फार कमी आहे. आता हरभऱ्याचे उत्पादन अधिकचे झाले तरी शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळणार की नाही, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. त्यामुळे कमी उत्पादन झाले तरी नुकसान आणि अधिकचे झाले तरी शेती घाट्यातच अशी अवस्था आहे.