लातूर -शहरातील महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या प्रचारार्थ रावसाहेब दानवे यांची सभा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी दानवे यांनी काँग्रेसवर चौफेर टीका केली. काँग्रेस ही जिंकण्यासाठी नाही तर स्वतःच्या अस्तित्वासाठी निवडणूकीच्या रिंगणात असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, महापौर सुरेश पवार, उमेदवार शैलेश लाहोटी आदी नेते उपस्थित होते.
देशमुखांवर केली टीका
६० वर्ष केवळ आश्वसनांची बोळवण काँग्रेसने केली होती. उजनीचे पाणी लातूरकरांना, हे त्यापैकीच एक आश्वासन आहे. ज्या लातूरकरांमुळे येथील नेत्यांना मुख्यमंत्री पद मिळाले त्यांनी लातूरकरांची तहान भागवली नाही. मात्र, २०१४ नंतर चित्र बदलले आहे. गरीब जनतेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदी विराजमान केले असून आता देशात काँग्रेस सर्वात गरीब झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत ते जिंकण्याच्या उद्देशाने नाही तर अस्तित्व टिकविण्यासाठी लढत असल्याचा घणाघात केंद्रीय मंत्री रावसाहेब यांनी केला.
हेही वाचा... महाराष्ट्राच्या प्रचार मैदानातून सोनियांची माघार?