महाराष्ट्र

maharashtra

केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात लातुरात गोट्या-खेळो आंदोलन; तहसील कार्यालयासमोर रंगला डाव

By

Published : Sep 28, 2020, 3:16 PM IST

Updated : Sep 28, 2020, 3:23 PM IST

नोटबंदी, बाजारसमित्यांचे खासगीकरण, कृषी विधेयकाला मंजुरी यामुळे जनतेचे नुकसानच झाले आहे. त्यामुळे लातुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तहसील कार्यालयासमोर गोट्याचा डाव मांडण्यात आला होता. सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी केलेले हे गोट्या-खेळो आंदोलन चर्चेचा विषय बनला होता.

rashtrawadi yuwak congress agitation for cancel agriculture law
केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात लातुरात गोट्या-खेळो आंदोलन

लातूर -केंद्र सरकारने घेतलेले निर्णय हे सर्वसामान्यांसाठी जाचक ठरत आहेत. कृषी विधेयकाला मंजुरी आणि कायमस्वरूपी कामागरांबद्दल घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांचे भवितव्य अंधकारमय होणार आहे. एकिकडे कोरोनामुळे जगणे मुश्किल होत असतानाच जनतेला आधार न देता कठोर निर्णय घेतले जात असल्याने सोमवारी तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गोट्या-खेळो आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधी घोषणाही देण्यात आल्या.

केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात लातुरात गोट्या-खेळो आंदोलन
कृषी विधेयक आणि कायमस्वरूपी कामागरांबद्दल केंद्र सरकारने अन्यायकारक निर्णय घेतल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. कृषी विधेयकाला मंजुरी देण्यात आल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. शेतात राबणारा शेतकरी बाजूला राहणार असून व्यापारी आणि कंत्राटदारांना याचा अधिक लाभ होणार आहे. तर दुसरीकडे पर्मनंट कर्मचारी यांना देखील कंत्राटीपद्धतीने कामावर घेण्याचे अधिकार संबंधित कंपन्याना देण्यात आले आहेत. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढणार आहे. तरुणांच्या नौकारीवर कायम टांगती तलवार राहणार आहे. 2014 पासून भाजप सत्तेत आल्यापासून घेण्यात आलेले निर्णय हे जनतेला मारक ठरत आहेत. नोटबंदी, बाजारसमित्यांचे खासगीकरण, कृषी विधेयकाला मंजुरी यामुळे जनतेचे नुकसानच झाले आहे. त्यामुळे लातुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तहसील कार्यालयासमोर गोट्याचा डाव मांडण्यात आला होता. सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी केलेले हे गोट्या-खेळो आंदोलन चर्चेचा विषय बनला होता. यावेळी राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Last Updated : Sep 28, 2020, 3:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details