लातूर - मी तसे वक्तव्य केलेचं नाही. ते वक्तव्य म्हणजे वाक्यांची जुळवाजुळव होती, असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी एका कार्यक्रमात त्यांनी भारतामधील ४० अतिरेक्यांना(जवानांना) मारल्याचे विधान केले होते. मात्र, तसे विधान केलेच नसल्याचेल स्पष्टीकरण दानवेंनी दिले.
...ते वक्तव्य म्हणजे वाक्यांची जुळवाजुळव; दानवेंची सारवासारव - रावसाहेब दानवे
लातूरमध्येही प्रभावीपणे प्रचार यंत्रणा राबवत आहे. इतरांनाही संधी मिळावी म्हणून उमेदवार बदलला आहे. यामध्ये काही नाराजी नसून सर्व भाजपची टीम कामाला लागली असल्याने या मतदार संघात सुधाकर शृंगारे यांचाच विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
लातुरात लोकसभेचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या उमेदवारी अर्ज सादर करताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
भाजपने प्रचाराला सुरुवात केली असून सर्वधिक जागा या युतीलाच मिळणार आहेत. लातूरमध्येही प्रभावीपणे प्रचार यंत्रणा राबवत आहे. इतरांनाही संधी मिळावी म्हणून उमेदवार बदलला आहे. यामध्ये काही नाराजी नसून सर्व भाजपची टीम कामाला लागली असल्याने या मतदार संघात सुधाकर शृंगारे यांचाच विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मोजक्या पदाधिकाऱ्यांना घेऊन हा अर्ज दाखल करण्यात आला.