लातूररक्षाबंधन Rakshabandhan हा बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण गुरुवारी सर्वत्र आनंदात साजरा झाला. मात्र लक्ष्मण डावरे हे बसचालक कोल्हापूरच्या प्रवाशांना घेऊन नांदेडकडे निघाले असता लातूर नांदेड मार्गावरील Latur Nanded Marg मौजे चापोली येथे त्यांची बहीण रुपालीने आपल्या भावाला रस्त्यावर राखी बांधून औक्षण केले. Rakhi tied to the brother on the road हे दृश्य पाहून उपस्थित भारावून गेले होते.
अनेक भाऊ बहिण या बसमधून प्रवास मौजे चापोली येथील लक्ष्मण डावरे Laxman Davre bus driver हे कोल्हापूर बस आगारामाध्ये चालक म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी ते आपल्या कर्तव्यावर होते. रक्षाबंधनाचा सण असल्याने प्रवाशांची रेलचेल होती. भाऊ कोठेही असला तरी या दिवशी राखी बांधुन घेण्यासाठी आपल्या बहिणीकडे येतो. गुरुवारीही अनेक भाऊ बहिण या बसमधून प्रवास करत होते. मात्र बसचालक लक्ष्मण या दिवशी सुट्टी न घेता जनसेवेचे कर्तव्य बजावत होते. योगायोगाने कोल्हापुरच्या प्रवाशांना नांदेड येथे सोडण्याची जबाबदारी लक्ष्मण यांच्यावर होती.