महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल 9 लाखांचा मुद्देमाल जप्त - vivekanand police latur

लॉकडाऊनमुळे सर्वत्र कमालीची शांतता आहे. अशा परिस्थितीत हॉटेल, लॉजवर जुगार खेळायला मिळत नाही. म्हणून शहरातील सहयोग नगरातीलच दयानेश बेंबडे याच्याच घरी पत्त्याचा खेळ रंगला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच, विवेकानंद पोलीस ठण्याच्या पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणी 12 जण हे जुगार खेळत होते.

raid on gambling dens in latur, 12 people arrested
लातुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल 9 लाखांचा मुद्देमाल जप्त

By

Published : Jul 25, 2020, 3:16 PM IST

लातूर -जुगार अड्डयावर छापा टाकत तब्बल 9 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई शहरातील सहयोग नगरात करण्यात आली.

लातुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल 9 लाखांचा मुद्देमाल जप्त

लॉकडाऊनमुळे सर्वत्र कमालीची शांतता आहे. अशा परिस्थितीत हॉटेल, लॉजवर जुगार खेळायला मिळत नाही. म्हणून शहरातील सहयोग नगरातीलच दयानेश बेंबडे याच्याच घरी पत्त्याचा खेळ रंगला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच, विवेकानंद पोलीस ठण्याच्या पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणी 12 जण हे जुगार खेळत होते. तर या ठिकाणांहून रोख रक्कम, गुटखा, धारदार शस्त्र असा 9 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर या 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दीड हजाराच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे 15 दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, अशा परिस्थितीमध्येही जुगार खेळण्यासाठी काहीपण असा प्रकार समोर आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details