लातूर - जिल्ह्याच्या सीमा सील असतानाही पुणे येथून सीमा ओलांडत असलेले 28 प्रवासी रेणापूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यांची सर्व सोय प्रशासनाच्यावतीने करण्यात आली असतानाही या प्रवाशांनी रात्रीतून धूम ठोकली असून मुखेड, औराद बऱ्हाळीकडे मार्गस्थ झाले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व जिह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. असे असतानाही अनेकजण आपले गाव जवळ करत आहेत. पुणे येथून मूळचे मुखेड व औराद बऱ्हाळी येथील 28 प्रवासी प्रवास करीत असताना रेणापूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.