लातूर - बांधकाम परवान्यावर झालेली चूक दुरूस्त करण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या नगरपरिषदेच्या अभियंत्यास लाचलूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. नगरपरिषदेच्या परिसरातच लाचेची रक्कम स्वीकारताना अभियंता राकेश निलकंठ महाकुलकर याला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
ती 'चूक' अभियंत्याला पडली महागात; लाच घेताना रंगेहात पकडले - पोलीस उपअधिक्षक माणिक बेंद्रे
बांधकाम परवान्यावर झालेली चूक दुरूस्त करण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या नगरपरिषदेच्या अभियंत्यास लाचलूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. नगरपरिषदेच्या परिसरातच लाचेची रक्कम स्वीकारताना अभियंता राकेश निलकंठ महाकुलकर याला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
![ती 'चूक' अभियंत्याला पडली महागात; लाच घेताना रंगेहात पकडले](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4726424-thumbnail-3x2-latur.jpg)
घराच्या बांधकाम परवान्यावर चूक झाल्याने बांधकामात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे तक्रारदाराने अनेक वेळा नगरपरिषदेच्या कार्यालयात फेऱया मारल्या. मात्र, याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने अखेर 5 हजार रुपयांची रक्कम घेऊन हे काम करण्याचे ठरले. यापैकी अडीच हजार रुपये देत असताना शुक्रवारी(दि.११ऑक्टो) सायंकाळी या स्थापत्य विभागाच्या अभियंत्याला रंगेहात पकडण्यात आले. त्यानुसार अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपअधिक्षक माणिक बेंद्रे, पोलीस निरिक्षक कुमार दराडे, बाबासाहेब काकडे, संजय पस्तापुरे यांनी ही कारवाई केली.