लातूर -वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यावश्यक सेवांच्या ठिकाणीच इतर सेवा उपलब्ध करून द्या, अशा सूचना पालकंमंत्री अमित देशमुख यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास हातभार लागणार आहे.
जिल्हाधिकारी तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतल्यांनातर देशमुख यांनी मनपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील भाजी- मंडई बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विविध ठिकाणी गल्ल्यांध्ये भाजीपाला विक्री सुरू आहे. यामुळे आणखी धोका वाढण्याची शक्यता आहे. यावर पर्याय म्हणून प्रभागनिहाय रेशन दुकानजवळच भाजीपाला आणि फळविक्रीसाठी जागा उपलब्ध करण्याच्या सूचना देशमुख यांनी दिल्या.