लातूर - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने बसवलेल्या नवीन वीज मिटरमुळे अधिक वीजबिल येत असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्ह्यात आंदोलन हाती घेण्यात आले आहे. गुरुवारी (दि.२५ जुलै) रोजी पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या घरासमोर हलगी आंदोलन केल्यानंतर आज आमदार अमित देशमुख यांच्या बाभूळगाव येथील घरासमोर आंदोलन करण्यात आले. घराजवळ आंदोलनकर्ते पोहोचताच पोलिसांनी त्यांना अडवले.
वंचित बहुजन आघाडीचा अमित देशमुखांच्या घरावर धडक मोर्चा; पोलिसांनी रोखले - आमदार अमित देशमुख
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने बसवलेल्या नवीन वीज मिटरमुळे अधिक वीजबिल येत असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्ह्यात आंदोलन हाती घेण्यात आले आहे.
अतिरिक्त वीजबिलाचा मुद्दा घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन उभे केले जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देऊन पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना ग्रामपंचायत कार्यलयासमोर अडवले. वीजबिलामुळे सर्वसामान्यांचा खिसा कापला जात असल्याचे वंचितच्या नेत्यांनी सांगितले. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी याबाबत उदासीन आहेत.
या प्रश्नाचे गांभीर्य कळण्यासाठी आंदोलन जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या घरावर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीकडून सांगण्यात येत आहे. विद्युत मीटर बदलूनही समस्या कायम असल्याने ग्राहक त्रस्त आहेत.