लातूर -जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे. आज जिल्ह्यातील निलंग्यामध्ये मुस्लीम समाज बांधवांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला. यावेळी भारत मातेचा जयघोष करण्यात आला, तर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मोरक्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
निलंग्यात मुस्लीम बांधवांकडून पुलवामा हल्ल्याचा निषेध - muslim community
आज जिल्ह्यातील निलंग्यामध्ये मुस्लीम समाज बांधवांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला.
लातूरात निषेध
या आत्मघाती हल्ल्यात ४५ जवानांना वीरमरण आले असून त्याचे पडसाद आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहेत. शुक्रवारची नमाज अदा करून मुस्लीम बांधवांनी शिवाजी चौकामध्ये एकत्र येऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला.
यावेळी हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. निलंग्यातील मुस्लीम बांधवांनी पाकिस्तानच्या विरोधात घोषणा दिल्या.