लातूर -नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून निलंगा येथे नागरिकांनी रस्त्यावर उतरुन तीव्र रोष व्यक्त करत मोठा विरोध केला आहे. 'जमीयत ए उलेमा हिंद'च्या वतीने शुक्रवारी शिवाजी चौकापासून उपविभागीय कार्यालयावर केंद्रसरकार विरोधात मोर्चा काढण्यात आला.
लातूरमध्ये 'कॅब'च्या विरोधात 'जमीयत ए उलेमा हिंद' इतर पक्षांचा मोर्चा हेही वाचा - नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक सर्व राज्यांना लागू करावेच लागणार; 'ही' आहे घटनात्मक तरतूद
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत आता बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना (हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख) भारताचं नागरिकत्व देण्यात येणार आहे. त्यामुळे आंदोलक रस्त्यावर उतरले होते.
'नागरिकत्व दुरूस्ती कायदा संविधानविरोधी आहे. घटनेच्या मुलभूत तत्वाशी विसंगत आहे नागरिकत्व मिळविण्यासाठी विशिष्ट धर्माचे धर्माचे धर्मातंर करण्यास प्रवृत्त करणारा हा कायदा आहे. तरी याला आमचा पूर्णपणे विरोध आहे ते त्वरित रद्द करावे.' असे निवेदन निलंगा उपविभागीय अधिकारी विकास माने यांना मुस्लिम संघटनेच्यावतीने देण्यात आले.
यावेळी 'जमीयत ए उलेमा हिंद'चे निलंगा प्रभारी हाफेज महेबूब, हाफेज जमिल, मुफ्ती रिजवान, मुफ्ती उस्मान, कांग्रेसचे नेते अभय साळुंके, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष इस्माईल लदाफ, नगरसेवक महंमदखान पठाण, नगरसेवक इरफान सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन चाऊस, शेरे-ए-हिंद शहीद टिपु सुलतान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मुजीब सौदागर, तालुका अध्यक्ष सबदर खादरी, कांग्रेसचे दयानंद चोपणे, सुधाकर पाटील, गोविंद शिंगाडे, असगर अन्सारी, लाला पटेल, एमआयएमचे तालुका अध्यक्ष सय्यद शाहरुख, या मुक्क मोर्चामध्ये उपस्थित होते.
हेही वाचा - 'कॅब' : आसाम, दिल्ली अन् पश्चिम बंगालमधील आंदोलन तीव्र; ईशान्य सीमेवरील १०६ रेल्वेगाड्या रद्द