लातूर -शहरात सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे लातूर आगारातून मार्गस्थ होणाऱ्या बसेस २ तासांसाठी बंद ठेवण्यात आल्या. तसेच मुख्य बाजारपेठमधील दुकानेही बंद ठेवण्यात आली.
लातुरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मोर्चा; बाजारपेठ, बससेवा बंद - नागरिकत्व दुरुस्ती कायदा
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. त्याचप्रमाणे लातूरकरांनी देखील या कायद्याला विरोध दर्शवत मोर्चा काढला. शहरातील गंजगोलाई येथून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर तहसील कार्यालयाजवळ मोर्चाचा समारोप होईल.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. त्याचप्रमाणे लातूरकरांनी देखील या कायद्याला विरोध दर्शवत मोर्चा काढला. शहरातील गंजगोलाई येथून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर तहसील कार्यालयाजवळ मोर्चाचा समारोप होईल. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी बससेवा 2 तासासाठी बंद ठेवण्यात आली. या मार्गावरील दुकानही बंद आहेत. सकाळपासून मोर्चाचे नियोजन केले. तसेच जागोजागी कार्यकर्ते नेमण्यात आले. कडेकोट पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे.