लातूर - दुष्काळी असलेल्या लातूर जिल्ह्यात सलग तीन दिवस पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात पेरणीपूर्व शेती मशागतीच्या कामांना वेग आला असून शेतकऱ्यांना खरीप पेरणीचे वेध लागले आहेत.
लातूरात सलग तीन दिवस पाऊस; पेरणीपूर्व मशागतींना वेग
लातूरात सलग तीन दिवस पावसात सातत्य राहिल्याने खरिपाच्या पेरणीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नांगरणी, कोळपणीची कामे वेगात होऊ लागली आहेत. बी-बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे.
पेरणीपूर्व मशागत
सलग तीन दिवस पावसात सातत्य राहिल्याने खरिपाच्या पेरणीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नांगरणी, कोळपणीची कामे वेगात होऊ लागली आहेत. बी-बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक असून सध्या बाजारपेठेत बियाणांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे शेतकरी घरच्या बियानांवरच भर देत आहेत. पावसामध्ये असेच सातत्य राहिले तर खरिपाच्या पेरण्या वेळेत होतील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.