महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शांततेत जगायचे असेल तर मोदी सरकारला हटवा - प्रकाश आंबेडकर - prakash ambedkar

अहमदपूर येथे डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची आंबेडकरांनी भेट घेतली. निलंगा येथील सभेदरम्यान केवळ २५ मिनिटांमध्ये आंबेडकरांनी जनतेशी संवाद साधला. वेळेअभावी प्रकाश आंबेडकर यांना जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी यांनी निर्धारित वेळेचे बंधन लक्ष्यात आणून दिले.

वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर

By

Published : Apr 8, 2019, 3:23 AM IST

लातूर - देशाच्या सर्वाच्च पदावर असलेला व्यक्ती जर दंगलखोर असेल, तर शांतता राहणे शक्य नाही. गेल्या ७० वर्षात हिंसा वाढली. आगामी काळात शांततामय जीवन जगायचे, तर मोदी सरकारला हटवा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. निलंगा येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्राध्यापक राम गारकर आणि उस्मानाबाद मतदार संघाचे अर्जुन सलगर यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.

अॅड. प्रकाश आंबेडकर सभेला संबोधताना


लातूर लोकसभा मतदार संघात प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी अहमदपूर आणि निलंगा येथे सभा घेतल्या. यावेळी मोदी सरकारसह काँग्रेसच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केले. जीएसटी, नोटबंदी यामधून चोरांच्या सरकारने जनतेला लुटले आहे. याचे परिमाण आता या सर्वसाममन्याला सहन करावे लागत आहेत. या सरकारने देशाला किती लुटले आहे याचा हिशोब काढायचा असेल तर आपले उमेदवार लोकसभेत पाठविण्याचे आवाहन आंबेडेकर यांनी केले. ७० वर्षानंतर देशात बदल झाला, पण तो हिंसक बदल झाला. त्यामुळे देश पिछाडीवर आला आहे. भविष्यात जर मोदी सरकार सत्तेवर आले तर लोकशाहीच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणूका कालबाह्य होऊन हुकूमशाही उदयाला येईल. त्यामुळे भविष्यातील धोका लक्ष्यात घेता या वैचारिक निवडणुकांना सामोरे जाण्याचे त्यांनी आवाहन केले.

वंचित आणि दुर्लक्षित घटकातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कामाची संधी देण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केले आहे. त्यामुळे घराणेशाहीला कंटाळून आता भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्तेही आपल्यासोबत असल्याचे विश्वास यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. अहमदपूर येथे डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची आंबेडकरांनी भेट घेतली. निलंगा येथील सभेदरम्यान केवळ २५ मिनिटांमध्ये आंबेडकरांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी उमेदवार राम गारकर, उस्मानाबादचे उमेदवार अर्जुन सलगर, आण्णाराव पाटील यांच्यासह लातूर, उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील नागरिक उपस्थित होते. अहमदपूर येथील सभेत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details