लातूर - गेल्या अनेक वर्षांपासून उदगीर जिल्हा निर्मितीचा मुद्दा गाजत आहे. लातूर, नांदेड या जिल्ह्यांचे विभाजन करण्याचा आणि नवीन उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी जोर धरत आहे. या संदर्भात मागील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत चर्चा केली. त्यानंतर याबाबतचे प्रस्ताव मागवण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे आता जिल्हा निर्मीतीच्या हालचालींना वेग आला आहे.
हेही वाचा... माझी मेट्रो नागपूर : 'मला श्रेय नको तर, जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आहे'
औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विभागीय आयुक्तांची बैठक पार पडली. यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी लातूरचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात उदगीर जिल्हा निर्मिती संदर्भातील माहिती तात्काळ देण्यासंदर्भात सांगण्यात आले आहे. तसेच प्रशासकीय इमारतीसाठीचे काम गतिमान करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.