लातूर -राज्यात सर्वत्र रस्त्याची कामे प्रगतीपथावर असली तरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 च्या रखडलेल्या कामामुळे जळकोट तालुक्यातील नागरिक त्रस्त आहेत. जांब (बु) ते जळकोट या तीन किमी रस्त्याचे काम गेल्या 5 महिन्यापासून रखडले असल्याने वाहनधारकांना आता पावसाळ्यात मार्गस्थ होताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
लातूर : अनेक महिन्यांपासून काम रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था.. वाहनधारक त्रस्त - जळकोट तालुक्यातील नागरिक त्रस्त
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 च्या रखडलेल्या कामामुळे जळकोट तालुक्यातील नागरिक त्रस्त आहेत. नव्याने रस्ता होणार म्हणून आहे तो रस्ता उखडून ठेवण्यात आला होता. मात्र, गेल्या 5 महिन्यापासून या रस्त्याचे कामच झालेले नाही. मुरूम टाकलेला रस्ता आता चिखलमय झाला आहे. यातच गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे प्रवाश्यांना जीव मुठीत धरून मार्गस्थ व्हावे लागत आहे.
पावसाळा आला की गावच्या रस्त्याची दुरवस्था हे नित्याचेच असते, पण राष्ट्रीय महामार्गाचीही हीच अवस्था झाली आहे. जळकोट शहरालगत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 चे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेले आहे. नव्याने रस्ता होणार म्हणून आहे तो रस्ता उखडून ठेवण्यात आला होता. मात्र, गेल्या 5 महिन्यापासून या रस्त्याचे कामच झालेले नाही. दरम्यानच्या कालावधीत केवळ मुरूम टाकण्यात आला होता. त्यांनतर ना खडी टाकण्यात आली ना सिमेंट काँक्रीटचे काम झाले. त्यामुळे मुरूम टाकलेला रस्ता आता चिखलमय झाला आहे. यातच गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे प्रवाश्यांना जीव मुठीत धरून मार्गस्थ व्हावे लागत आहे.
जळकोट हे तालुक्याचे ठिकाण असून नांदेड, कंधार या परिसरातून उदगीर, कर्नाटक राज्यात जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे जड वाहनांचीही मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे लहान-मोठे अपघात हे ठरलेलेच. त्यामुळे वेळेत काम होणार नव्हते तर रस्ता खोदून कशाला ठेवला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या ठिकाणी ना कंत्राटदार फिरकलेला आहे, ना सी. पी. डब्लू. डी चे अधिकारी. नांदेड येथील मुख्य अभियंता सावत्रे त्यांच्याशी संपर्क साधला असता पावसाने उघडीप देताच कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आणखीन तीन महिने तरी रस्त्याची दुरवस्था आणि वाहनधारकांची अडचण कायम असणार आहे हे नक्की..