लातूर - वातावरणातील बदलाचा फटका प्रचारात दंग असलेल्या नेत्यानांही सहन करावा लागत आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना व्हायरल इन्फेक्शनमुळे लातूर ग्रामीणचे काँग्रेस उमेदवार धीरज देशमुख दोन दिवसापासून रुग्णालयात दाखल आहेत. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून दुपारी डिस्चार्ज होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख रुग्णालयात... - latur Politics News
वातावरणातील बदलाचा प्रचारात दंग असनाऱ्या नेत्याना फटका बसला आहे. वातावरणातील बदलामुळे काँग्रेसच्या धीरज देशमुख यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख
प्रचाराची रणधुमाळी आणि वातावरणातील बदलामुळे सध्या उमेदवारही हैराण आहेत. वाढते ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे साथीच्या आजारात वाढ होत आहे. याचाच परिणाम धीरज देशमुख यांच्यावर झाला असून सोमवारपासून ते लातूरतील सदासुख रुग्णालयात भरती झाले आहेत. उपचारानंतर त्यांना आज दुपारी डिस्चार्ज दिला.
Last Updated : Oct 16, 2019, 3:30 AM IST