निलंगा (लातूर)- तालुक्यातील कोराळवाडी येथे अवैधरीत्या गावठी दारू काढत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. यात ५ लाख ५० हजार रुपये किंमतीचे १३ हजार ५०० लिटर रसायन व साहित्य आढळून आले. ते संपूर्ण नष्ट करून कोराळवाडी येथील दहा जणांवर कासार सिरशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलंगा : गावठी हातभट्टीवर गुन्हे शाखेचा छापा, साडेपाच लाखांचे रसायन नष्ट - लातूर गुन्हे बातमी
निलंगा तालुक्यातील कोराळवाडी येथील एका हातभट्टीवर छापा टाकत सुमारे साडेपाच लाखांची गावठी दारू व रसायन नष्ट करण्यात आले. याप्रकरणी कासार सिरशी पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृृत्त असे, कोराळवाडी भागात गावठी दारू तयार होत असल्याची माहिती लातूरच्या गुन्हे शाखेला मिळाली. यावरून त्यांनी सिरशी पोलिसासह हातभट्टीवर छापा टाकला. त्या ठिकाणी दहा जण गावठी दारू तार करताना साहित्यासह आढळून आले. त्यानंतर या ठिकाणचा पंचनामा करुन सुमारे साडेपाच लाख रुपये किंमतीचे साडेतेरा हजार लिटर रसायन नष्ट करण्यात आले. त्यानंतर कोराळवाडी येथील रहिवासी लक्ष्मण रेवणे, पंडीत रामा रेवणे, हाणमंत तिपन्ना उमापुरे, संजय गोविंद पाटील, युवराज रेवणे, लक्ष्मण पंदले, बालाजी पाटील, विठ्ठल दमदाडे, लिंबाजी व्हनाळे यांच्या विरोधात कासार सिरशी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, अपर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, पोलीस निरीक्षक सुनिल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल रेजितवाड, टी.आर.भालेराव, पोलीस कर्मचारी अंगद कोतवाल, रामदास नाडे, राजेंद्र टेकाळे, सदानंद योगी, सिद्धेश्वर जाधव, युसुफ शेख, सुधीर कोळसुरे, रामहरी भोसले, प्रकाश भोसले, भागवत कटारे, विनोद चिलमे, नायदेव पाटील, बंटी गायकवाड, रामभाऊ मस्के, सचिन मुंडे, प्रदीप चोपणे, प्रताप गर्जे, मन्मथ धुमाळ, रवी कांबळे यांच्या पथकाने ही कामगीरी केली आहे.