लातूर - सध्या लोकसभा निवडणुकांच्या अनुशंगाने आदर्श अचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र, याच आदर्श अचासंहितेच्या नावाखाली पोलसांनी एका सराफा व्यापाऱ्याला तब्बल दीड लाखाला लूटले असल्याची घटना उदगीर येथे घडली आहे. यासंबंधी व्यापाऱ्याने थेट विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे.
अचारसंहितेच्या नावाखाली पोलीसांनीच केली व्यापाऱ्यांची लूट, व्यापाऱयाची पोलीस महानिरिक्षकाकडे धाव - latur
त्यानंतर तब्बल ४ तासांनी ती बॅग चन्नावारांना परत करण्यात आली. मात्र, बॅगेत दीड लाख रुपये कमी होते. त्यामुळे पोलीसांनीच बॅगेतील दीड लाख रुपये काढून घेतले असल्याची तक्रार चन्नावरांनी थेट विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे.
सचिन बालाजी चन्नावार यांचे उदगीर शहरातील सराफा लाईनमध्ये 'श्री बालाजी' नावाचे सराफाचे दुकान आहे. शनिवारी रात्री ८: ३० च्या दरम्यान चन्नावार दुकान बंद करून दुकानातील ६ लाख रुपये घेऊन घराकडे निघाले होते. दरम्यान, उदगीर शहर ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवूण तपासणीस सुरवात केली. यावेळी पोलीस कर्मचारी श्रीहरी डावरगावे, महेश खेळगे, बडे, रमेश बिरले यांनी कसून तपासणी केल्यानंतर सचिन यांच्याकडे ६ लाख रुपये आढळून आले. एवढी रक्कम तुमच्याकडे कशी काय ? तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात ? अशी विचारणा करत पोलिसांनी चन्नावारांची बॅग आपल्या ताब्यात घेतली. एवढेच नव्हे तर जवळच्याच एका दुकानात पोलिसांनी चन्नावारांना डांबून ठेवले.
त्यानंतर तब्बल ४ तासांनी ती बॅग चन्नावारांना परत करण्यात आली. मात्र, बॅगेत दीड लाख रुपये कमी होते. त्यामुळे पोलीसांनीच बॅगेतील दीड लाख रुपये काढून घेतले असल्याची तक्रार चन्नावरांनी थेट विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चौकशी करुन योग्य कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.