महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मसलगा तलावातून अवैध वाळू उपसा, 10 वाहनांवर केली कारवाई

परवानगी नसताना लाॕकडाऊन काळात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या 10 वाहनांवर पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख यांनी कारवाई केली आहे.

By

Published : May 23, 2020, 6:49 PM IST

latur
अवैध वाळू उपसा करणाऱ्या 10 वाहनांवर कारवाई

लातूर - परवानगी नसताना लाॕकडाऊन काळात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या 10 वाहनांवर पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख यांनी कारवाई केली आहे. सदरील 10 वाहने तहसीलदार गणेश जाधव यांच्या ताब्यात दिली आहेत. निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पातून अवैध वाळू व माती उपसा केला जात होता.

अवैध वाळू उपसा करणाऱ्या 10 वाहनांवर कारवाई

महसूलचे कर्मचारी, अधिकारी कोरोनावर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना करत असताना त्यांना चकवा देत अवैधपणे वाळू उपसा चालू होता. शेकडो वाहने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत माती व वाळू उपसा करत आहेत. यावर निलंगा तहसीलदार गणेश जाधव यांनी मागील पंधरा दिवसाखाली दंडात्मक कारवाई करून महसूल वसुल केला होता. परंतू, यावर न थांबता हे चोरट्या मार्गाने मसलगा मध्यम प्रकल्पातून वाळू व माती उपसा चालूच ठेवली आहे. चार हायवा व नंबर नसलेले सहा ट्रॕक्टर जप्त केले आहेत. यांच्यावर तहसीलदार काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details