महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उन्हाचा ताप ! पंतप्रधान नरेंद्र मोदींची औशातली सभा सकाळीच पडणार पार - narendra modi

लातूर-उस्मानाबाद या दोन्ही मतदारसंघासाठी औसा हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या शहराची निवड केली आहे. युतीमधील अनेक नेत्यांची उपस्थिती या सभेला राहणार असल्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : Apr 4, 2019, 1:37 PM IST

लातूर - लातूर-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ८ एप्रिल रोजी औसा येथे जाहीर सभा होत आहे. या दोन्ही मतदारसंघासाठी हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने औसा शहराची निवड केली असून युतीमधील अनेक नेत्यांची उपस्थिती या सभेला राहणार असल्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

लातूर : पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर

भाजपकडून लातूर मतदारसंघाचे उमेदवार हे सुधाकर शृंगारे तर उस्मानाबाद मतदार संघातून शिवसेनेच्यावतीने ओमप्रकाशराजे निंबाळकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. औसा तालुका लातूर जिल्ह्यात असला तरी लोकसभा निवडणुकांमध्ये उस्मानाबाद मतदारसंघात सहभागी आहे. त्यामुळे लातूर आणि उस्मानाबाद या दोन्ही मतदारसंघाचा विचार करून ही सभा आयोजित करण्यात आली आहे.

या सभेकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, आरपीआयचे रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, रासपचे महादेव जानकर यांची उपस्थिती राहणार आहे.

उन्हाचा ताप !
८ एप्रिल रोजी सकाळी ९:१५ वाजता ही जाहीर सभा होणार असून सध्या सभास्थळी जय्यत तयारी करण्यात येत आहे. वाढत्या उन्हाचा सभेवर परिणाम होऊ नये म्हणूनच सकाळच्या सत्रात ही सभा होणार आहे. वर्ध्यात मोदींच्या सभेला गर्दी कमी होती. त्यावर उन्हामुळे गर्दी कमी झाल्याचे भाजपकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे वर्ध्यातील पुनरावृत्ती टाळण्यासाठी लातुरातील सभा सकाळी घेण्यात येत असल्याची चर्चा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details