लातूर - गांवगुंडानी फसवून जमीन व घरावर कब्जा केल्याने बेघर झालेल्या विधवा महिलेने मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. सव्वाचार एकर जमिनीची मालकीण असणारी ही बेघर महिला तिच्या मुलीसह गावाच्या हनुमान मंदिरात आसऱ्यास आहे.
निलंग्यातील हंगरगा शिरसी येथील एका विधवा महिलेच्या घरावर आणि शेतावर गावगुंडांनी ताबा घेतल्यामुळे संबंधित महिलेवर बेघर होण्याची वेळ आली आहे. मागील दहा दिवसांपासून या दोघी माय-लेकी गावातील हनुमान मंदिरात राहतात. यासंबंधी पोलिसांत तीन वेळा तक्रार केल्यानंतरही कोणतीच दखल घेत नेसल्याचे या महिलेने सांगितले.
हंगरगा येथील सुमन शंकर पवार या महिलेचे पती एक वर्षापूर्वी मरण पावले होते. त्यानंतर, गावातील चार एकर आठरा गुंठे जमीन आणि एक घर या महिलेच्या नावे पतीच्या माघारी वारसा हक्का प्रमाणे नावे झाले आहे. परंतु गावातील तुकाराम माने व त्याची पत्नी लक्ष्मीबाई माने यांनी घराचे कुलूप तोडून, संपूर्ण सामान बाहेर फेकून घरावर ताबा घेतल्याचे या महिलेने निवेदनात म्हटले आहे. राम साधू पवार या व्यक्तीने चार एकर आठरा गुंठे जमीनीवर ताबा घेतला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. मारहाण केल्याचे देखील महिलेने सांगितले.
विधवेचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा; गावगुंडांनी बेघर केल्याने महिलेस मंदिराचा आसरा - CM uddhav thackeray
गांवगुंडानी फसवून जमीन व घरावर कब्जा केल्याने बेघर झालेल्या विधवा महिलेने मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. सव्वाचार एकर जमिनीची मालकीण असणारी ही बेघर महिला तिच्या मुलीसह गावाच्या हनुमान मंदिरात आसऱ्यास आहे.
गांवगुंडानी फसवून जमीन व घरावर कब्जा केल्याने बेघर झालेल्या विधवा महिलेने मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
माहेरी गेल्यानंतर हा हा सर्व प्रकार घडला आहे. यानंतर आम्ही दोघींना उघड्यावर रहायची वेळी आली आहे., असे महिला म्हणाली. यानंतर मी दिनांक १७ जुलै रोजी औराद शा. पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. आपली सर्व परिस्थिती सांगून, पोलिसांनी तरी न्याय द्यावा अशी विनंतीचा अर्ज संबंधित महिलेने केला आहे. मात्र पोलीस याची दखल घेतस नसल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
Last Updated : Jul 29, 2020, 1:35 PM IST