लातूर (निलंगा) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक छोटे-मोठे व्यवसाय ठप्प झाले होते. यामुळे, अनेकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली. तर, जिल्ह्यातील निलंग्यामध्येही लॉकडाऊनचा मोठा परिणाम झाला असून येथील सर्वपक्षीय सामाजिक संघटनेने नगरपालिका हद्दीतील मालमत्ता कर, नळ पट्टी व दुकान भाडे माफ करण्याची मागणी केली आहे.
निलंगा नगरपालिका हद्दीतील दुकानभाडे, मालमत्ता कर माफ करा; सर्वपक्षीय सामाजिक संघटनेची मागणी - nilanga municipal council news
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लातूर महानगरपालिकेने सर्व दुकान भाडे, नळपट्टी व इतर सर्व मालमत्ता कर माफ केले आहे. त्याच पद्धतीने निलंगा नगर पालिका हद्दीतील नळपट्टी, मालमत्ता कर व सदर दुकानांचे चालू वर्षाचे दुकानभाडे माफ करून सर्व जनतेला व व्यापाऱ्यांना सहकार्य करावे अशी मागणी येथील सर्वपक्षीय सामाजिक संघटनेच्या वतीने निलंगा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यासह संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे, अनेकांच्या पोटापाण्यावर गदा आली. निलंगा शहरामध्येही गंभीर स्थिती निर्माण होऊन नागरिक व्यापारी अडचणीत आला आहे. गोर गरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कोलमडलेली आहे. त्यामुळे, ज्या पद्धतीने लातूर महानगरपालिकेने सर्व दुकान भाडे, नळपट्टी व इतर सर्व मालमत्ता कर माफ केले आहे. त्याच पद्धतीने निलंगा नगर पालिका हद्दीतील नळपट्टी, मालमत्ता कर व सदर दुकानांचे चालू वर्षाचे दुकानभाडे माफ करून सर्व जनतेला व व्यापाऱ्यांना सहकार्य करावे अशी मागणी निलंगा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेस नेते अभय साळुंके, किसान काँग्रेसचे मराठवाडा महासचिव गोविंद शिंगाडे, इस्माईल लादाफ राकाँ शहराध्यक्ष, मुजीब सौदागर जिल्हाध्यक्ष टिपू सुलतान संघटना, अजगर अन्सारी विधानसभा अध्यक्ष काँग्रेस, सुधाकर पाटील काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष, उमेश सातपुते युवासेना उपजिल्हाप्रमुख, गणी खडके राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष, शकील पटेल माजी सरपंच दपका, अजित निंबाळकर जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस, गोविंद सुर्यवंशी, मुश्ताक बागवान, मुजमिल कादरी, गिरीष पात्रे, सिद्धेश्वर बिराजदार, गफ्फार लालटेकडे, विजय होगले आदी उपस्थित होते.