लातूर -जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अंबेगाव मोडवर लातूर-मसलगा-राठोड-निलंगा मार्गे धावणाऱ्या बसचा अचानक दरवाजा उघडल्याने एका प्रवाशाचा खाली पडून जागीच मृत्यू झाला आहे. तुकाराम पिराजी मरुरे (वय 70, रा. अंबेगाव) असे मृत प्रवाशाचे नाव आहे.
धावत्या बसमधून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू - लातूर
निलंगा या बसमधून (एम. एच. 14 बी. टी. 2255) प्रवास करीत असताना ते दरवाजाजवळ उभे होते. बस भरधाव असताना अचानक दार उघडले आणि मागच्या टायरखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
निलंगा या बसमधून (एम. एच. 14 बी. टी. 2255) प्रवास करीत असताना ते दरवाजाजवळ उभे होते. बस भरधाव असताना अचानक दार उघडले आणि ते खाली पडले.यामुळे मागच्या टायरखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. चालक गोविंद चंद्रकांत जाधव हे रस्त्याचा अंदाज न घेता भरधाव वेगाने गाडी चालवत होते, तर वाहक उमेश पंढरी सांडूर हे प्रवाशांचे तिकीट काढत होते. प्रवाशांनी दार व दार पट्टी व्यवस्थीत बंद न केल्याने हा अपघात घडला. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी बसच्या काचा फोडल्या. याबाबत निलंगा पोलीस ठाण्यात बसचालक गोविंद चंद्रकांत जाधव यांच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास ए. पी. आय डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सचिन उत्सुर्गे करत आहेत.