लातूर- जिल्ह्यात एकीकडे सूर्य आग ओकत आहे, तर दुसरीकडे पाण्याच्या शोधात वन्यजीव हे मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसून येत आहेत. रेणापूर तालुक्यातील खलंग्री-माकेगावच्या शिवारात पाण्याच्या शोधात एक दुर्मिळ वन्यजीव आढळले. हा नेमका कोणता प्राणी आहे, हे सुरुवातीला ग्रामस्थांच्या लक्षातच आले नाही. त्यानंतर प्राणी मित्रांना विचारणा केली असता, हे खवले मांजर असल्याचे समजले.
सध्या जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे नागरिकांना घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शिवाय वन्य प्राणीही पाण्याच्या शोधात आहेत. जिल्ह्यात खवले मांजर हे अतिशय दुर्मिळ आहेत. या मांजराला तहान लागल्यामुळे ते पिण्याच्या पाण्याच्या शोधात खलंग्री-माकेगावच्या शिवारात आले असण्याची शक्यता यावेळी प्राणी मित्रांनी व्यक्त केली.