महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुलाच्या अवयवदानावेळी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता नाही; पालकांचे आंदोलन

सप्टेंबर २०१७ मध्ये किरण लोभे याचा अपघात झाला होता. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्या जगण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे डॉक्टरांनी अवयवदान करण्याचा सल्ला दिला होता. लोभे कुटुंबीयांनी हा सल्ला मान्य करत अवयवदान केले.

आंदोलक

By

Published : Apr 20, 2019, 1:58 PM IST

लातूर - अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलाची जगण्याची शक्यता कमी असल्याने डॉक्टरांनी अवयवदानाचा सल्ला कुटुंबीयांना दिला. पण, अवयवदान करुनही दिली गेलेली आश्वासने प्रशासनाकडून पाळली गेली नाहीत. मुलाचे अवयवदान कुणाला करण्यात आले ते सांगण्यात आले नाही, असा आरोप करत लातुरातील लोभे कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांनी मतदानावर सुद्धा बहिष्कार घातला.

मृत किरण लोभेची आई

सप्टेंबर २०१७ मध्ये किरण लोभे याचा अपघात झाला होता. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्या जगण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे डॉक्टरांनी अवयवदान करण्याचा सल्ला दिला होता. लोभे कुटुंबीयांनी हा सल्ला मान्य करत अवयवदान केले. पण दीड वर्षानंतरही अवयवदान कुणाला करण्यात आले हे लोभे कुटुंबीयांना सांगण्यात आले नाही. त्यामुळे आंदोलनाचा मार्ग लोभे कुटुंबाने स्वीकारला आहे. प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांनी देखील त्यांना साथ देण्याचे ठरवले आहे.

उपचारादरम्यान हलगर्जीपणा झाला का? याची चौकशी केली जाणार होती. शिवाय घरातील एकास नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, असे काहीच न झाल्याचा आरोप किरण लोभे यांच्या आईने केला आहे. त्याच्या निषेधार्थ या प्रभागातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालून महानगरपालिकेसमोर आंदोलन सुरू केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details