लातूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लग्न कार्याला ब्रेक तर लागलाच आहे. पण कुणाचे निधन झाले तर अशा प्रसंगी एकत्रित येऊन दु:ख देखील व्यक्त करता येत नाही. ही परिस्थिती कारोनामुळे ओढावली आहे. लातूरमध्ये अंजनाबाई यांच्या अंत्यसंस्काराला दूरचे नातेवाईकांची वाट न पाहता अवघ्या १८ जणांनी हा विधी आटोपता घेतला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे कांबळे कुटूंबीयांने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लातुरमधील कांबळे कुटुंबीयांनी १८ माणसांच्या उपस्थितीमध्ये केला आजीचा अंत्यविधी - latur corona update
लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अंजनाबाई कांबळे (वय-१०८) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांचे अधिकतर नातेवाईक हे लातूर शहरात असले तरी बाहेरगावच्या कुणालाही न बोलावता कांबळे कुटुंबीयांनी अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला.
लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अंजनाबाई कांबळे (वय-१०८) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांचे अधिकतर नातेवाईक हे लातूर शहरात असले तरी बाहेरगावच्या कुणालाही न बोलावता कांबळे कुटुंबीयांनी अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन त्यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाने अशा प्रसंगी २५ व्यक्तींची मर्यादा घालून दिली आहे. मात्र, कांबळे कुटूंबीयांनी केवळी १८ माणासांच्या मदतीने हा अंत्यविधी आटोपता घेतला. सध्या नागरिकांची गर्दी रस्त्यावर येऊ नये म्हणून चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त आहे.